अनेक विद्यार्थी आयटीआय प्रशिक्षण पुर्ण करतात, त्यादरम्यान त्यांना विद्यावेतन दिले जाते, जास्तीत जास्त तरुणांना प्रशिक्षणा सोबत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे या सरकारच्या धोरणा बद्दल या कोर्स मध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत अप्रांटिसशीप स्किम साठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.