Course description

   ई-सेवा व्यवसाय हा डिजिटल युगातील एक महत्वाचा व्यवसाय आहे जो विविध सरकारी आणि व्यक्तिगत सेवा पुरवतो. या कोर्समध्ये तुम्हाला पॅन कार्ड, शॉप अ‍ॅक्ट, उद्योग आधार, फूड लायसन्स, पोलीस क्लीअरन्स प्रमाणपत्र, पासपोर्ट, गॅझेट, आणि यूडीआयडी इ. नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय हे अर्ज करण्यास सक्षम व्हाल. 

 कोर्सची गरज :   जनसामान्य, विद्यार्थी, महिला, तरुण, व्यावसायिक, नोकरदार अशा प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार आवश्यक असणा-या प्रत्येक कागदपत्रांची गरज तसेच अशा प्रकारच्या सेवा देणा-या प्रत्येक ई सेवा केंद्र चालकाला त्याविषयीची अगदी बेसिक पासूनची माहिती व प्रात्यक्षिक या कोर्स द्वारे उपलब्ध करुन देत आहोत.

कोर्सचा उपयोग  : या कोर्स नंतर कोणाच्याही मदतीशिवाय व कोणत्याही अडचणी शिवाय तुम्ही प्रत्येक सर्व्हिसचा फॉर्म भरु शकाल याची खात्री आहे. 

आम्हीच का ? : माहितीबाझार गेली 14 वर्षे या क्षेत्रात अविरत कार्यरत आहे. माहीतीबाझारचे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या खेड्या-पाड्यात, शहरात केंद्र चालक आहेत, जे माहितीबाझार द्वारे पुरविल्या जाणा-या माहितीच्या आधारे, तसेच माहितीबाझार च्या सपोर्ट द्वारे उत्तम कमाई करत आहे आणि पुढे वाटचाल करत आहेत. नवीन तसेच जुनी कोणतीही येणारी सर्व्हिस याविषयीची माहिती, तुम्हाला पडणारे प्रश्न या सर्वावर माहितीबाझार अ‍ॅकॅडमी चा ई सेवा कोर्स हा उत्तम व खात्रीशीर पर्याय आहे. 

हा कोर्सचा का? : प्रत्येक सर्व्हिस अंतर्गत भरला जाणारा फॉर्म याची वरवरची माहिती नसून या कोर्स मध्ये मुळा पासून ते अगदी टोकापर्यतची सर्व माहिती दिली आहे. येणा-या तसेच येऊ शकणा-या दोन्ही अ‍डचणींचा विचार करुन, तसेच सामान्य माणसाला सहज सोप्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने हा कोर्स तयार केला गेला आहे. 

फायदा : या कोर्स नंतर तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय प्रत्येक सर्व्हिस चा फॉर्म अगदी निर्धास्त पणे भरु शकाल. तेही कोणाच्याही मदतीशिवाय. 

What will i learn?

  • ई-सेवा व्यवसायाची संपूर्ण प्रक्रिया : पॅन कार्ड, शॉप अ‍ॅक्ट, उद्योग आधार, फूड लायसन्स, आणि इतर सेवा पुरवण्याचे सखोल ज्ञान मिळवा.
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : विविध ई-सेवा अर्ज कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन.
  • प्रॅक्टिकल्स आणि केस स्टडीज : प्रॅक्टिकल्स आणि केस स्टडीजच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा.
  • उद्यम नोंदणी, पासपोर्ट, गॅझेट, आणि यूडीआयडी सेवा : या सेवांची संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया शिका.

Requirements

  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप : अर्ज प्रक्रियेच्या सविस्तर प्रशिक्षणासाठी संगणक आवश्यक आहे.
  • इंटरनेट कनेक्शन: कोर्समधील व्हिडिओ आणि ऑनलाइन साहित्य पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.
  • मूलभूत संगणक ज्ञान: संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

Frequently asked question

कोर्स स्वतःच्या गतीने शिकण्यासाठी आहे, परंतु साधारणतः 8 ते 10 तासांत तो पूर्ण होऊ शकतो.

कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही पॅन कार्ड, शॉप अ‍ॅक्ट, उद्योग आधार, फूड लायसन्स, पोलीस क्लीअरन्स प्रमाणपत्र, पासपोर्ट, गॅझेट, आणि यूडीआयडी सेवा पुरवू शकाल.

होय, कोर्समध्ये अर्ज प्रक्रियेचे सविस्तर प्रॅक्टिकल्स समाविष्ट आहेत.

होय, कोर्समधील सर्व माहिती तुम्हाला तुमचा ई-सेवा व्यवसाय सुरू करण्यास आणि वाढवण्यास मदत करेल.

सर्व माहिती तज्ञ व्यक्तींनी पडताळून दिलेली असल्याने ती विश्वासार्ह आहे.

MahitiBazaar Trainer

₹ 7000

₹ 11000

Lectures

126

Skill level

Beginner

Expiry period

12 Months

Certificate

Yes

Related courses