जमिनी संबंधित कोणताही व्यवहार करताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जसे की 7/12, 8 अ चा उतारा, प्रोपर्टी कार्ड , गाव नमुना इ. सर्व कागदपत्रे काढण्यासाठी तासनतास तहसिल कार्यालयाबाहेर उभे राहण्याचे दिवस आता गेले..
सामान्य नागरिकांना जमिनीच्या व्यवहाराकरीता किंवा इतर कोणत्याही शासकिय कामाकरीता जी काही महाभुमिलेख अंतर्गत कागदपत्र आवश्यक असतात तीच कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिली आहेत. मात्र ती कशी काढावी, त्याचा कायदेशीर रित्या वापर कसा करावा, अशा कागदपत्रांचे वाचन कसे करावे ते कसे समजून घ्यावे याविषयी अजूनही बरेच जणांना ज्ञान नाही याच गोष्टींंचा सारासार विचार या कोर्स अंतर्गत करण्यात आला आहे.
या कोर्स मध्ये तुम्हाला सोप्या मराठी भाषेत सदर कागदपत्रे काढण्याची प्रक्रिया, त्याचे वाचन व त्याचा वापर इ. अनेक गोष्टींची माहिती तसेच प्रॅक्टिकल या कोर्स अंतर्गत देण्यात आले आहे.