7/12 हे प्रत्येक जमीनधारकाचा जमीनीच्या मालकीचा भक्कम पुरावा आहे. जमिनीची खरेदी, विक्री, बोजा चढविणे, बोजा उतरविणे, वारस नोंद करणे या आणि अशा अनेक सेवा आपण 7/12 म्युटेशन द्वारे घेऊ शकतो. जमिनीसंबंधित होणारा कोणताही बदल त्याची नोंद 7/12 मध्ये करणे अनिवार्य आहे.
या कोर्समध्ये तुम्हाला सोप्या मराठीत 7/12 म्युटेशन साठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि अर्जाची प्रक्रिया सखोलपणे शिकवली जाईल. कोर्समध्ये सविस्तर माहिती, व्हिडिओ प्रॅक्टिकल्स, आणि केस स्टडीजचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करण्यास सक्षम व्हाल.